माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

 

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

हृदयविकारनी निधन :

▫️जसवंत सिंह यांचे आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. २५ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले :

▫️“ जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील.

पंतप्रधान काय म्हणाले :

▫️“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली.

▫️अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे.

▫️अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!