खारेपाटण येथील सुकांत वरुणकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खारेपाटण येथील सुकांत वरुणकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*कोकण  Express*

*खारेपाटण येथील सुकांत वरुणकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी..*

*लसीकरणाला येणाऱ्यां ​५​ हजार ग्रामस्थांना पुरतील एवढे मोफत बिस्कीट पुडे आणि पाण्याची केली सोय*

​*खारेपाटण ः प्रतिनिधी*

 ​सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यसह संपूर्ण देशभर कोरोना प्रतिबंध लस देण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील कोविड प्रतिबंध लस देण्यात येत असून  येथे लसीकरणासाठी होणारी गर्दी व  अपुरी व्यवस्था लक्षात घेता खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व सुकांत वरुणकर यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी पाच हजार बिस्किट पुडे व पाच हजार पिण्याच्या पाण्याच्या बॉटल मोफत वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज जि.प.सदस्य रवींद्र जठार यांच्या शुभहस्ते खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड लसीकरण केंद्रावर पार पडला. या कार्यक्रमाला खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या रुग्ण कल्याणसमितीचे अध्यक्ष तथा माजी जि प व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्यासह पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे,रुग्ण कल्यान समितीचे सद्स्य सूर्यकांत भालेकर,सामाजिक कार्यकर्ते हरेष जनक,खारेपाटण येथील दानशूर व्यक्तिमत्व सुकांत वरुणकर, खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश गुरव,माजी सरपंच किशोर माळवदे,खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम,डॉ.पूजा ताडे आदी मान्यवर पदाधिकारी व अधीकारी उपस्थित होते​. ​खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व सुकांत वरुणकर यांच्या वतीने खारेपाटण प्रथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बिस्कीट पूड व थंडगार पिण्याच्या पाण्याची बॉटल देण्यात येत असून सुमारे​ ​​५००० बिस्कीट पुढे व पाण्याच्या बॉटल वरुणकर यांनी प्रा. आ.केंद्राकडे सुपुर्द केल्या आहेत. याच बरोबर अजूनही बिस्कीट पुडे किंवा पाण्याच्या बॉटल लागल्यास त्या आपण देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले​. ​तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सध्या कोविड लस घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांसह ​४५ वर्षाच्या पुढिल व्यक्तीची देखील दिवसेंदिवस  एकच  गर्दी वाढत असुन  सुकांत वरुनकर यांनी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून छत बांधून दिले असून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आता बसण्याची चांगली व्यवस्था झाली आहे.सुकांत वरुणकर यांच्या या सामाजिक योगदानाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!