कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला प्रशासनाकडून मान्यता देण्यास वेळकाढूपणा

कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला प्रशासनाकडून मान्यता देण्यास वेळकाढूपणा

*कोकण  Express*

*कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला प्रशासनाकडून मान्यता देण्यास वेळकाढूपणा*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप*

*अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन कोविड सेंटर तयार..*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून पर्यटन सुविधा केंद्र येथे अद्यावत २५ बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांसाठी टीव्ही, वायफाय कनेक्शन व लागणारी यंत्रसामुग्री उभारण्यात आलेले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच हे कोविड सेंटर तयार आहे. मुख्याधिकारी यांनी गेल्या १५ दिवसापासून मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे करत आहोत. कणकवली नगरपंचायतच्या कोविड सेंटरला प्रशासनाकडून मान्यता देण्यास वेळकाढूपणा धोरण अवलंबळे जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला.

कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर येथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, अभिजित मुसळे, बंडू गांगण, डॉ.विद्याधर तायशेट्ये, डॉ.पावसकर, डॉ.पटेल, न.प.चे कर्मचारी मनोज धुमाळे, विजय राणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी एका बैठकीत कणकवलीत होऊ घातलेल्या सेंटरला परवानगी देण्याचे मान्य केले होते. आमच्या कोविड सेंटर नंतर देवगडला मंजुरी दिली. कोविड केअर सेंटरची खरी गरज आहे.कारण शहरात दर दिवशी पंधरा ते वीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. याबरोबरच शिरवल, हरकुळ खुर्द येथील कोविड सेंटरमध्ये सर्व बेड फुल झाले आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.यामुळे या कोविड सेंटरला तात्काळ मान्यता द्यावी, जेणेकरून रुग्णांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी समीर नलावडे यांनी केली.

या कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर उपलब्धता कठीण आहे, ते आपल्या स्तरावर डॉक्टरांची व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले. त्यानंतर डॉ.विद्याधर तायशेट्ये संपर्क साधला, त्यांनी नगरपंचायत कोविड सेंटर मध्ये शहरातील जनतेच्या मोफत व्हिजिट देण्याचे सांगितले आहे. डॉक्टर यांच्या साठी स्पेशल रुम तयार करण्यात आली आहे.यासोबतच चांगल्या प्रतीचे रुग्णांना जेवण आम्ही देणार असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!