*कोकण Express*
*कणकवली न.प.च्या कोविड सेंटरला तात्काळ मंजुरी द्या!*
*राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात न.प.च्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला तात्काळ मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी केली आहे.
सध्या जिल्ह्या सोबतच कणकवली शहरात ही कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची गैर सोय होवू नये, यासाठी न.प.कडून कोविड सेंटरचे काम तयार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीमुळे हे कोविड सुरू करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे याची दखल घेवून तात्काळ मंजुरी मिळावी.