राऊत फडणवीस भेट :
▪️शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
▪️ महाविकास आघाडीत सध्या महामंडळाच्या वाटपावर चर्चा सुरू आहे. यात जोरदार रस्सीखेच होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
▪️त्यामुळे आघाडीत सर्वच काही आलबेल नाही असं बोललं जात आहे. राऊतांनी फडणवीसांची भेट घेऊन दबावाची खेळी खेळली असावी असा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केला आहे.
⏰ राष्ट्रवादीचे वर्चस्व :
▫️गेल्या काही दिवसांपासून या तीनही पक्षांमध्ये महामंडळाच्या वाटपावरून चर्चा सुरू आहे.
▫️काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महत्त्वाच्या महामंडळांवर दावा केला आहे. तर शिवसेनेलाही महत्त्वाची महामंडळं पाहिजे आहेत. सत्तेत राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. आपली कामे होत नाही अशी नाराजी शिवसेनेत आहे.
▫️तर मंत्रिमंडळात जडजोड करावी लागल्याने आता महामंडळाचं वाटप करताना काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.
▫️या मतभेदांमुळेच शुक्रवारी झालेली बैठक अर्धवट सोडावी लागली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
📌 त्यामुळे राऊत-फडणवीस भेटीमुळे शिवसेनेने अचुक टायमिंग साधलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
🔅मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत, भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यतील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाहीये.
🔅 मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो. जेंव्हा शरद पवार यांची ‘सामना’साठी मुलखात झाली तेंव्हा मी जाहीर केले होते की देवेंद्र फडणवीस यांची मुलखात घेईल.
🔅‘सामाना’च्या मुलखातीसाठी आम्ही भेटलो. राहुल गांधी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती घेणार असं मी जाहीर केलं होतं.