चौकुळ, केगदवाडी व कुंभवडे येथील नागरिकांनी लसीकरण घेण्यासाठी संपर्क साधा

चौकुळ, केगदवाडी व कुंभवडे येथील नागरिकांनी लसीकरण घेण्यासाठी संपर्क साधा

*कोकण Express*

*चौकुळ, केगदवाडी व कुंभवडे येथील नागरिकांनी लसीकरण घेण्यासाठी संपर्क साधा*

*शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांचे संपर्काचे आवाहन*

*आंबोली ःप्रतिनिधी*

जिल्ह्यात सद्य स्थितीत कोरोना लसीकरण ठीक ठिकाणी सुरू असून, वाहतूक बंद असल्याने काही दुर्गम भागातून लस घेण्यासाठी २० किलोमीटर प्रवास करून जावे लागत आहे. परंतु हा प्रवास खाजगी वाहनाने करने गावातील गरीब जनतेला शक्य नाही आहे. त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी चौकुळ केगदवाडी व कुंभवडे या भागासाठी ही लस आंबोली येथे उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या भागातील ज्या नागरिकांना लस घेण्यासाठी जायचे आहे त्यानी स्थानिक शिवसेना कार्यकर्ते रुपेश गावडे नेनेवाडी, अरुण गावडे चौकुळ, अभिजित मेस्त्री चौकुळ, विजय गावडे कुंभवडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!