*कोकण Express*
*मासिक पाळी नि कोरोना लस’; त्या व्हायरल मेसेजवर सरकारने केला खुलासा*
केंद्र सरकारने जाहीर केले प्रमाणे 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये. व्हायरल होणाऱ्या या मेसेजवर सरकारकडून विश्वास ठेऊ नये असे स्पष्टीकरण दिले गेले आहे.
महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस अगोदर आणि 5 दिवस नंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये, असं सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितले गेले आहे.
यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, हा मेसेज खोटा आहे. तरी नागरिकांनी अफवांना बळी पडू नका., असं सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.
या मेसेज मधील माहिती खोटी असून मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका, असं मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
अफवांपासून लांब राहा!
महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे
यातील माहिती खोटी असून, मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही.