*कोकण Express*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करूळ चेक नाक्यावरील पोलीस बंदोबस्तात वाढ*
*पोलीस प्रशासनाचा निर्णय ; विनापास व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई अटळ…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर करूळ येथील चेक नाक्यावरील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या चेकनाक्यावर पोलीस प्रशासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तर इतर पोलीस कर्मचारी वाढविण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोग्य पथकाकडून देखील प्रवाशांची आरोग्य तपासणी व रँपीड टेस्ट केली जात आहे.
जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांची यापुढे कडक तपासणी करण्यात येणार आहे. विनापास प्रवास करणाऱ्या प्रवाशावर कारवाईचा बडगा उगारला जाईल. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना यातून मुभा असेल. विनाकारण कोणी प्रवास करत बसू नये. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणा-यांनी मास्कचा वापर करावा. कोरोना महामारीत जनतेच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.