*कोकण Express*
*जिल्ह्यात नव्याने २३९ जण कोरोना बाधीत*
*डॉ.श्रीपाद पाटील;कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू*
*सिंधुदुर्गनगरी ता.२५:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ५९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यू झाला असून आणखी २३९ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली. मृतांमध्ये शिरगांव-देवगड येथील ६५ वर्षीय महिला आहे.तिला हृदय रोग व उच्चरक्तदाबाचा त्रास होत.सावडाव-कणकवली येथील ५५ वर्षीय महिला आहे.तिला मधुमेह, हृदयरोग व उच्चरक्तदाबाचा त्रास होत.नाधवडे-वैभववाडी येथील ५५ वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत.तर मालवण येथील ५० वर्षीय पुरुष आहे.त्याला उच्चरक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. दरम्यान चौघांचाही मृत्यू हा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे.