‘ई-पास’वरून गोव्यात ये-जा करणारे संभ्रमात

‘ई-पास’वरून गोव्यात ये-जा करणारे संभ्रमात

*कोकण Express*

*‘ई-पास’वरून गोव्यात ये-जा करणारे संभ्रमात…*

*संबंधित वेबसाईट जाहीर करावी : गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे मागणी*

*बांदा  ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४,००० तरुण- तरुणी गोवा या ठिकाणी कामानिमित्त जातात. बांदा सटमटवाडी या ठिकाणी त्यांना रोखले जात आहे. तसेच ई पास संदर्भात काही त्रुटी आहेत काहींना त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट, rt-pcr टेस्ट पाहिजे तसाच ई पास पाहिजे या सर्व गोष्टींमध्ये काहीजण संभ्रमात आहेत. त्यामुळे जी ई पास साठी वेबसाईट आहे ती आपण जाहीर करावी. त्यामध्ये कोण कोणते नियम आहेत तेही आपण जाहीर करावे व त्या पासचा कालावधी किती आहे याची सविस्तर माहिती द्यावी जेणेकरून कामानिमित्त त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर होतील, असे आवाहन मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना केले आहे. श्री गवंडे पुढे म्हणाले की, ई पासची साईड ओपन केल्यानंतर त्यामध्ये दोन बाबी दाखवतात दिलेले ऑप्शन वेगळे आहेत तसेच काही गाव पातळीवर ग्रामपंचायतीमार्फत उपाययोजना करण्यात येत असतील तर ते सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष यांना कल्पना द्यावी व गोव्याला कामानिमित्त जाणार येणाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा, अशीही मागणी गवंडे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!