गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही

गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही

*कोकण  Express*

*गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक-युवतींना ई-पासची गरज नाही.पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यांना सुट देण्यात येणार आहे.त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा सरपंच ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे.याबाबत लवकरच तहसिलदार राजाराम म्हात्रे बैठक घेऊन तशा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे.याबाबत चा तोडगा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलून काढला

तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी ही राऊळ यांच्या तोडग्याला मान्यता दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात युवक युवती गोव्यात रोजगार तसेच शिक्षणासाठी जातात मात्र गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्याप्रमाणात मिळत आहेत.त्याचा प्रसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ई पास ची अट घातली होती
पण या अटी मुळे गोव्यातून येणाऱ्या ना मोठा फटका बसल्याने सर्वच राजकीय पक्ष आपल्या परीने तोडगा काढत आहेत.त्याप्रमाणेच तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी गोव्यात जाणाऱ्यासाठी ई-पासची अट तात्पुरती रद्द करावी अशी मागणी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांसाठी त्यामधून सुट देण्यात आली आहे.तसेच नंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र कींवा सरपंच ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येणार आहे, असे राऊळ यांनी सांगितले.

यासाठी राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली तसेच त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनीही पालकमंत्री सामंत यांच्या आदेशाला अनुकूलता दर्शविली आहे.

तहसिलदार राजाराम म्हात्रे म्हणाले, आपण आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांची बैठक घेऊन या युवक युवतीना ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्र तर कामावरील ओळखपत्र दाखवल्यानंतर सोडण्यात यावे म्हणून बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.यामुळे गोव्यात जाणाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे, असे राऊळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!