नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्याकडून ७५ फळझाडांची भेट*

नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्याकडून ७५ फळझाडांची भेट*

*कोंकण एक्सप्रेस*

*नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्याकडून ७५ फळझाडांची भेट*

*कणकवली: सौ. संजना हळदिवे*

कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाढदिवसाला ७५ विविध फळ झाडांची भेट देण्यात आली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी १० एप्रिल रोजी ही भेट देऊन तसेच आबूली फुलांचा हार घालून श्री. राणे यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी भाजपचे संदीप कुडतरकर, संदेश निकम, मंगेश सावंत, नितीन सावंत, सुधीर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. सावंत म्हणाले की, राणेसाहेबांना शेतीची मोठी आवड आहे. याचबरोबर फळ लागवड हा त्यांचा आवडीचा विषय आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये बरीच वर्षे काम केले आहे. अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये विविध उपक्रम ही राबवले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ७५ विविध फळ झाडांची रोपे भेट दिली आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!