असलदेत खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमात अन्नदान सेवा

असलदेत खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमात अन्नदान सेवा

*कोंकण एक्सप्रेस*

*असलदेत खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमात अन्नदान सेवा*

*प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ; वृध्दाश्रमातील आजी – आजोबांनी अनोख्या स्टाईलने दिल्या शुभेच्छा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , माजी केंद्रीय मंत्री , रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा संघाचे खा. नारायण राणे यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त व 75 व्या वर्षात पर्दापण केल्याने अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त असलदे ग्रामपंचायत , असलदे सोसायटी,असलदे भाजपाच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमातील 50 ते 60 आजी आजोबांना अन्नदान सेवा देण्यात आली. तसेच गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , प्रकाश परब , भाई तोरस्कर , विभाग अध्यक्ष रघुनाथ लोके , संतोष परब , संदेश शेटये आदींसह गावातील ग्रामस्थ , मुख्याध्यपक व शिक्षक उपस्थित होते. दिवीजा वृध्दाश्रमात खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आजी आजोबांच्या उपस्थित केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. आजी आजोबांच्या सेवेसाठी तोंडवली नर्सिंग विद्यालयाचे अंकिता हरयान , मेघा मुदळे , प्राची हिंदळेकर , ज्योती देवळी , प्रज्ञा बने , प्रियल डावखुरे , विद्या डिंगणेकर आदी विद्यार्थी आहेत.

असलदे येथील दिवीजा वृध्दाश्रमात सुमारे 60 आजी आजोबा दाखल आहेत. त्यांना 10 एप्रिल खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अन्नदान करण्यात आले. तसेच गावातील प्राथमिक शाळा तावडेवाडी , नांदगाव तिठा असलदे , असलदे मधलीवाडी , गावठणवाडी येथील 4 शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
फोटो –
दिवीजा वृध्दाश्रमात खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवा देत केक कापताना सरपंच चंद्रकांत डामरे , भगवान लोके , पंढरी वायंगणकर , सचिन परब,रघुनाथ लोके , प्रकाश परब ,संतोष परब,संतोष घाडी , दुस-या छायाचित्रात असलदेतील प्राथमिक शाळांमध्ये साहित्य वाटप करताना मान्यवर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!