*केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निम्मिताने शिरगांव येथे ऍम्ब्युलन्स चे लोकार्पण*

*केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निम्मिताने शिरगांव येथे ऍम्ब्युलन्स चे लोकार्पण*

*कोंकण एक्सप्रेस*

*केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निम्मिताने शिरगांव येथे ऍम्ब्युलन्स चे लोकार्पण*

*औचित्य वाढदिवसाचे संकल्प जनसेवेचा*

*शिरगांव / संतोष साळसकर*

केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार सर्वांचे लाडके नेते सन्माननीय राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी पदार्पण वाढदिवसाच्या निमित्ताने शिरगाव जिल्हा परिषद च्या वतीने ॲम्बुलन्स चे आज 10 एप्रिल रोजी शिरगाव जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि पंचायत समिती सदस्य शितल तावडे यांच्या हस्ते फीत कापून हा लोकार्पण सोहळा पार पडला.
शिरगाव मध्ये यापूर्वीपासून राजे ग्रुप ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आरोग्यसेवा मागील 12 ते 13 वर्ष शिरगांव पंचक्रोशी देत आहे त्याचाच एक भाग म्हणून अद्ययावत अशी नवीन ॲम्बुलन्स देऊन जनसेवेचा आणि आरोग्य सेवेचा वसा पुढे नेण्यासाठी शिरगाव जिल्हा परिषदचे सर्वच पदाधिकारी, सन्माननीय राणे साहेब यांचे हितचिंतक हे सर्व मिळून हा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे यांचा आरोग्य सेवेतील सुधारणा करण्याच्या संकल्पमध्ये या ॲम्बुलन्सच्या लोकार्पणामुळे हातभार लागेल असा विश्वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ऍड. प्रकाश बोडस, ऍड. श्री. कुलकर्णी, देवगड पं. स. माजी सभापती सदानंद उर्फ नंदू देसाई, देवगड तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मिलिंद साटम, शिरगांव उपसरपंच संतोष कुमार फाटक, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, तोरसोळे माजी सरपंच सुरेश राणे, माजी जि. पं. सदस्य सुभाष नार्वेकर, हडपिड माजी सरपंच दाजी राणे, आरे माजी सरपंच महेश पाटोळे, ओंबळ सरपंच अरुण पवार, संतोष जंगले आदिसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!