सोनोग्राफी तज्ञ गैरहजर; दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात ठाकरे सेनेची धडक

सोनोग्राफी तज्ञ गैरहजर; दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात ठाकरे सेनेची धडक

*कोंकण एक्सप्रेस*

*सोनोग्राफी तज्ञ गैरहजर; दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात ठाकरे सेनेची धडक*

*दोडामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळत असून रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार आहे. गुरुवारी (९ एप्रिल) सोनोग्राफी तज्ञ अनुपस्थित असल्याने गरोदर महिलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
ही बाब लक्षात येताच ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी रुग्णालयात धडक देत जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला. त्यानंतर संबंधित तज्ञांना तात्काळ रुग्णालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
यापुढे आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा धुरी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!