*खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती*

*खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती*

*कोंकण एक्सप्रेस*

*खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्याच्या राजकारणात आक्रमक आणि तितकेच विकासाभिमुख नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खा. नारायण राणे यांच्या सार्वजनिक जीवनाला सात दशके पूर्ण होत आहेत. कोकणच्या मातीतून आपला प्रवास सुरू करून राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून ‘खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्ष समिती’तर्फे कणकवलीत एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती हे आहे. राणे आणि शिंदे यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आणि सध्याच्या महायुतीमधील त्यांचे स्थान पाहता, हा सोहळा केवळ कौटुंबिक किंवा शुभेच्छांचा सोहळा न राहता त्याला मोठे राजकीय वलय प्राप्त झाले आहे. महायुतीमधील मजबूत समन्वय आणि परस्पर आदराचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो कार्यकर्ते आणि चाहते कणकवलीत दाखल होणार आहेत. हा कार्यक्रम एका मोठ्या राजकीय शक्तीप्रदर्शनाचे आणि कृतज्ञता सोहळ्याचे स्वरूप घेणार आहे. प्रशासनाकडून आणि आयोजकांकडून सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण कणकवली शहर सध्या पोस्टर, बॅनर्स आणि उत्साही वातावरणाने ‘राणेमय’ झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!