*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट एज्यु. सोसा. च्या वतीने जि.प.सदस्य राजन चिके यांचा सत्कार*
*”जिल्हा परिषद निवडून आलो तिथेच माझं राजकारण संपलं…आता जनतेची सेवा करणे हाच माझा धर्म… राजन चिके*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
नवनिर्वाचित जि. प.सदस्य तथा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री.राजन चिके यांचा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म.ज.सावंत-पटेल, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार वि.रा.तायशेटे, संचालक रंजन नेरूरकर, मनिष गांधी, सु.मा.सावंत,आनंद मर्ये, प्राचार्य श्री.डॉ. नारे , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद पारकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.राजन चिके यांचा संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यांचा सत्कार करण्यात आला, प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना राजन चीके म्हणाले “मी जिल्हा परिषदला निवडून आलो तिथेच माझं राजकारण संपलं,आता जनतेची सेवा करणे हाच माझा धर्म…” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष जोईल सर व आभार ज्येष्ठ शिक्षिका रेवडेकर मॅडम यांनी मानले.

