*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थ्यांनी जाणून घेतली इतिहासाची साधने*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला शाळा नं.1मधील विद्यार्थ्यांना “इतिहासाची साधने व प्रदर्शन’ अंतर्गत शिवकालीन विविध शस्त्रांची, नाण्यांची तसेच इतिहासाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी इतिहास जाणून घेत विविध शस्त्रे हाताळली.
हा कार्यक्रम शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका लिना नाईक यांनी पुरस्कृत केला होता. तर यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर, सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते.
फोटोओळी – विद्यार्थ्यांनी “इतिहासाची साधने व प्रदर्शन’ अंतर्गत शिवकालीन विविध शस्त्रांची, नाण्यांची तसेच इतिहासाची माहिती देण्यात आली.

