कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सध्या संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये बाहेरून येणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गावागावातून फिरत आहेत.
सदर फेरीवाल्यांमुळे समस्या निर्माण होत आहेत स्थानिक व्यावसायिकांवर अन्यायकारक परिणाम होत आहे
वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रस्त्यावर गर्दी वाढत आहे
कोणतीही नोंद/परवानगी नसताना व्यवसाय चालवला जात आहे त्यामुळे
सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संशयास्पद हालचाली देखील आढळून येतात तसेच कणकवलीत सध्या चोरीच्या घटना वाढत आहेत वाहनांवर नंबर प्लेट नाहीत वाहनांची कागदपत्रे नाहीत वाहन परवाना नाहीत अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत आहे स्थानिक नागरिकांवर नियमांची कडक अंमलबजावणी होत असताना बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे सर्वांवर समान नियम लागू करून निष्पक्ष कारवाई करण्यात यावी संबंधित फेरीवाल्यांची सखोल चौकशी करण्यात यावी परवानगी नसलेल्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी
नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात यावी
संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवून यावर नियंत्रण ठेवण्यात यावे अशी मागणी मनसे कडून कणकवली पोलीस स्टेशन कडे करण्यात आली त्यावेळी मनसे चे जि उप सचिव अनंत आचरेकर तालुका अध्यक्ष शांताराम सादये विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे व विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष समिर तेली उप तालुका अध्यक्ष अम्रुते माजी तालुकाध्यक्ष बिडवाडकर देवेंद्र जाधव सुनील सोनार आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!