*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार*
*उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलाभाजपात पक्ष प्रवेश*
*शाखाप्रमुख, बूथप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश*
*मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश*
*देवगड : प्रतिनिधी*
देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शालघालून पालकमंत्री नितेश राणे यांनी
भाजपात स्वागत केले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थितीत होते.जामसंडे-देवगड येथील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याने देवगड तालुक्यात उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

देवगड येथील उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद नितीन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख,बूथप्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये शाखाप्रमुख राजेंद्र शिरोडकर, बूथप्रमुख घननीळ कणेरकर, शाखाप्रमुख प्रदीप पडेलकर, बूथप्रमुख भालचंद्र पारकर, शाखाप्रमुख गणपत जाधव, बूथप्रमुख प्रवीण जाधव, शाखाप्रमुख ओंकार लाड, बूथप्रमुख गणपत लाड, बूथप्रमुख सुरज भिडे, शाखाप्रमुख दिनेश परब, बूथप्रमुख जनार्दन कोयंडे, तसेच बबन केवळ यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या प्रवेशामुळे देवगड तालुक्यात भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून उबाठा सेनेना मात्र आणखीनच दुबळी झाली आहे.
यावेळी बोलताना निनाद नितीन देशपांडे म्हणाले आम्ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू भाजप मध्ये प्रवेश केला आहे. विकास आणि जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले नेतृत्व पालकमंत्री नितेश राणे आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी सक्रिय काम करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.दरम्यान हा पक्ष प्रवेश उबाठा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे

