विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाच जामीन मंजूर

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाच जामीन मंजूर

*कोंकण एक्सप्रेस*

*विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाच जामीन मंजूर*

*कणकवली / प्रतिनिधी*

परदेशी असलेल्या पतीच्या मैत्रीचा फायदा घेत त्याच्या पत्नीला शासकीय कामाच्या निमित्ताने बाहेर बोलावून शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुबारक शहाबुद्दीन साटविलकर याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्याच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पाहिले.

मार्च २०२३ ते मे २०२५ या कालखंडात फिर्यादी हीचे पती परदेशात असल्याने आरोपीने त्यांची शासकीय कामे तालुक्याच्या ठिकाणी असल्याचे सांगून विवाहितेला बोलविले. त्यानंतर तेथे शारिरीक संबंध प्रस्थापीत केले तसेच त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तीच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कुणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करून मुलांना गायब करण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर मा.न्या.सं. कलम ६४, (१), ६४ (२), ७४.७५, ७८ तसेच ३५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर करताना पीडिता अथवा कुटुंबियांशी कोणतीही संबंध ठेऊ नये, साक्षीपुराव्यात ढवळाढवळ करू नये, अशा अटी घातल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!