*कोंकण एक्सप्रेस*
*करूळ घाटात भिषण आपघात*
*वैभववाडी (प्रतिनीधी)*
करुळ येथील घाटात काल (ता.२) पहाटे
सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोल्हापूरवरून येणारा (KA28 AA5545) सिमेंटने भरलेला ट्रक सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सह्याद्री वनजीव रक्षक हेमंत पाटील व त्यांचे सहकारी, तसेच संबंधित तलाठी व कोतवाल यांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला. मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पुढील तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, वैभववाडी
अधिक तपास करत आहेत.

