*कोकण Express*
*लोकांनी स्थानिक प्रशासनाला मदत करावी- सभापती रवी पाळेकर यांचे आवाहन*
देवगड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लोकांनी स्थानिक प्रशासनाला मदत करावी असे आवाहन मा.सभापती रवी पाळेकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्व भूमीवर सभापतींनी लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.
लोकांच्या सहकार्य केले तर आपण कोरोना चा समूळ नाश करू शकतो असेही ते म्हणाले लोकांनी कायद्याचे उलंघन न करता कायद्याचे काटेकोर पालन करून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जे जे उपाय करावे लागतील ते करावे असे सभापती म्हणाले.
आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील कोरोणाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवगड तालुक्यासाठी 100 छोटे सिलेंडर आणि 25 बेड स्थानिक प्रशासनाला उपलब्ध करून दिलेले आहेत. यामुळे कोरोनाशी लढणे आता सोपे जाणार आहे पाळेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे देवगड तालुक्याच्या वतीने आभार मानले आहेत.