*कोकण Express*
*जिल्ह्यातील खाजगी, सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करा !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जागतिक कोरोना महामारी काळात सतत रुग्णालयांत रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असून मुंबई तथा तत्सम महाराष्ट्रातील रुग्णालयांमधे आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट तात्काळ करण्यात यावे, त्यामुळे विरार सारखे खाजगी रुग्णालयात लागलेली आग भविष्यात टाळू शकतो.
त्यामुळे भविष्यात होणारी प्राण हानी वाचवू देखील शकतो. तरी आपण सर्व खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पार्सेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.