श्री सातेरी देवी पंचायतन देवतेचा १९ वा वर्धापन दिन ५ एप्रिल रोजी..

श्री सातेरी देवी पंचायतन देवतेचा १९ वा वर्धापन दिन ५ एप्रिल रोजी..

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री सातेरी देवी पंचायतन देवतेचा १९ वा वर्धापन दिन ५ एप्रिल रोजी..*

*दोडामार्ग :शुभम गवस*

मौजे केंद्रे बुद्रुक पुनर्वसन (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे श्री सातेरी देवी पंचायतन देवतेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी गणपती स्मरण व पंचामृताभिषेकपूर्वक महापूजा, त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद होणार आहे.
संध्याकाळी भजन व पावणी कार्यक्रमानंतर रात्री ‘सुवर्ण सुंदरी’ हे काल्पनिक ऐतिहासिक नाटक सादर करण्यात येणार आहे. या सोहळ्यास भाविक व नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सातेरी देवस्थान कमिटी, केंद्रे बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!