*कोंकण एक्सप्रेस*
*धडाडीचे नेतृत्व निलेश राणे यांची दक्षिण मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख पदी नियुक्ती; शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण*
*मुंबई:*
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, कुडाळ-मालवणचे कार्यसम्राट आमदार डॉ. श्री. निलेश नारायणराव राणे यांची ‘दक्षिण मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश राणे यांच्या या नियुक्तीमुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असून कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य पसरले आहे. निलेश राणे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी, अहोरात्र जनसेवेसाठी आणि दूरदर्शी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा आता मुंबईतील संघटना वाढवण्यासाठी होणार आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
या निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना सह-संपर्कप्रमुख श्री. मनोज प्रताप राणे यांनी निलेश राणे यांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सस्नेह शुभेच्छा दिल्या.
“आमचे राजकीय गुरुस्थानी असणारे डॉ. निलेश राणे साहेब यांची ही नियुक्ती अत्यंत आनंददायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दक्षिण मुंबईत अधिक आक्रमकपणे आणि प्रभावीपणे जनतेचे प्रश्न सोडवेल,” असा विश्वास मनोज राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून राणे साहेबांचे अभिनंदन केले. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शुभेच्छुक:
मनोज प्रताप राणे
शिवसेना सह-संपर्कप्रमुख, सिंधुदुर्ग जिल्हा.

