सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश

सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश*

*सिंधुदुर्गनगरी दिनांक 30(जिमाका) :-*

जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनिय बातमिदारांमार्फत माहिती काढून असे करत असलेल्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे N-CORD संदर्भातील मासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते.
तसेच अशाप्रकारचे बेकादेशीर कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंध करणेसाठी, शाळा / कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थांचे परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री होत असल्यास त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी संबधीत विभागांना आदेशीत केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यत्त्वे लगतचे गोवा राज्य आहे. त्या राज्यातून शिरोडा, वेळागर याठिकाणी परदेशी नागरीक मोटार सायकल किंवा बोटीद्वारे प्रवास करीत असतात. त्यांचेकडुन अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री व सेवन होत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून जनजागृती अभियान हाती घेवुन अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणण्याबाबत सूचना श्री. सुकटे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!