*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले कॅम्प येथील महिला ७ महिने बेपत्ता*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
वेंगुर्ले कॅम्प, मटवाडी येथील विद्यादेवी गुणाजी वारखंडकर (५८) ही महिला बेपत्ता झाल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत तिच्या भावाने दिलेल्या तक्रारी नुसार ती नाफ्ता झाल्याची नोंद पोलीसांत दाखल झाली आहे.
वेंगुर्ले कॅम्प भटवाडी येथील विद्यादेवी गुणाजी वारखंडकर (५८) हिची गेल्या १५ वर्षापासून मानसिक स्थिती बरी नाही. त्यामुळे ती अधून मधून घरातून निघून जायची व आपणच काही दिवसांनी पुन्हा घरी येत असे. मात्र, यावेळी बराच कालावधी होऊनही ती न आल्याने तिचा भाऊ सदाशिव वारखंडकर यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान विद्यादेवी गुणाजी वारखंडकर घरात कोणालाही काही न सांगता कोठेतरी निघुन गेली. ती घरी आली नाही. याबाबतची तक्रार तिचा भाऊ सदाशिव वारखंडकर यांनी पोलिसांत केली आहे
नापत्ता झालेल्या विद्यादेवी हिचा रंग गोरा, मध्यम बांधा, उंची सुमारे ५ फुट २ इंच, चेहरा उभट, केस पांढरे पिकलेले असून खांद्यापर्यंत लांब आहेत. डोळे काळे, अंगात साडी, पायात प्लास्टिक चप्पल, गळ्यात काळ्या मण्याचे मंगळसूत्र व हातात-पिवळसर धातुच्या ४ बांगड्या, हातात प्लास्टिकच्या पिशव्या तसेच पिवळ्या रंगाचा प्लास्टिकचा रेनकोट असे तिचे वर्णन आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशन ०२३६६-२६३४३३ किंवा पोलीस हवालदार भगवान चव्हाण ९४२३३१५५३७ यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे अधिक तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान चव्हाण करीत आहेत.

