*कोंकण एक्सप्रेस*
*वायंगणी-कोंडुरावाडी येथील युवक दिड वर्ष होऊनही बेपत्ताच*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
वायंगणी कोंडुरावाडी येथे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुनिल दादू पेडणेकर (३६) हा घरातील टॉवेल घेवून नेहमी प्रमाणे समुद्र किनारी वेळेवर जातो असे सांगून गेलेले होता तो दुपारपर्यंत जेवणाच्या वेळेस घरी परत नसल्यानें तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ सोमा पेडणेकर यांनी पोलीसांत दिलेली असून पोलीस स्थानकांत नापत्ता झाल्याचे नोंद झाली आहे.
वायंगणी कोंडुरावाडी येथील सुनिल दादू पेडणेकर हा दि २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे अंगावर टॉवेल टाकून समुद्रकिनारी गेला अन तो नेहमीप्रमाणे दुपारी जेवणाच्या वेळेह आला नाही. त्यामुळे किनारी भागात तसेच परीसरात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो कुठेच आढळला नाही. त्याची उंची ५ फुट, रंग-काळा सावळा, काळसर रंगाची हाप पेंट व अंगावर टॉवेल असे वर्णनाचा असून अशी व्यक्ती कुणास दिसून आल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशन ०२३६६-२६३४३३ किंवा तपासी अंमलदार भगवान कदम ९४२३३१५५३७ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण करीत आहेत.

