*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला शाळा नं. 1 ला अॅक्वा रो वॉटर प्युरिफिल्टर प्रदान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
दीडशे पेक्षाही जास्त पटसंख्या असलेल्या वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला शाळा क्र.1 या शाळेला दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय गुंडू फोवकांडे यांनी सुमारे दहा हजार रूपये किंमतीचा अॅक्वा रो वॉटर प्युरिफिल्टर भेट म्हणून दिला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, सदस्य देवेंद्र वेंगुर्लेकर, इंद्रायणी पडवळ, मुख्याध्यापक ज्ञाने·ार हरमलकर यांच्यासह शिक्षक प्रशांत मांडे, मिलिंद व्हावळे, राकेश वराडकर, प्रगती आव्हाड आदी उपस्थित होते. श्री.फोवकांडे यांच्या दातृत्वाबद्दल शाळेतर्फे यांचे अभि वेंगुर्लेकर यांच्या हस्ते आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले.

