मंगळवारी मळ आणण्याचा कार्यक्रम

मंगळवारी मळ आणण्याचा कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*मंगळवारी मळ आणण्याचा कार्यक्रम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुर्ल्याची ग्रामदेवी श्री सातेरीचा मळलेपन विधी व शतचंडी महायाग अनुष्ठान सोहळा 31 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. या मळलेपन कार्यासाठी लागणारी मळ (वारूळाची माती) आणण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 31 मार्च रोजी होणार आहे.
दि.31 रोजी सकाळी 6.30 वाजता श्री सातेरी मंदिरातून तरंगदेवता अवसारी स्वरूपात मळ आणण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. अणसूर घाटी येथील नियोजित ठिकाणी पोहचल्यावर धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर अवसारी देवतेकडून वारूळाची माती काढून झाल्यावर ढोलताशांच्या गजरात बहुसंख्य भाविक ती मळ सातेरी मंदिरात आणून ठेवणार आहेत. त्याचदिवशी रात्रौ 8 वाजता श्री सातेरी दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहेत. तरी भाविकांनी दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!