सुशांत दळवी हत्या प्रकरण: अमर कदम केवळ ‘मोहरा’? खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या; महाविकास आघाडीची आक्रमक मागणी

सुशांत दळवी हत्या प्रकरण: अमर कदम केवळ ‘मोहरा’? खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या; महाविकास आघाडीची आक्रमक मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*सुशांत दळवी हत्या प्रकरण: अमर कदम केवळ ‘मोहरा’? खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या; महाविकास आघाडीची आक्रमक मागणी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवलीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या हत्येमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात श्री. विवेक ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी, कणकवली यांना लेखी निवेदन देऊन तपासाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
​अमर कदमच्या भूमिकेवर संशय
​शुक्रवारी २७ मार्च २०२६ रोजी हरकुळ गावात सुशांत दळवी यांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमर सत्यवान कदम याला ताब्यात घेतले असले, तरी तो केवळ एक ‘मोहरा’ असावा असा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. हत्येची पद्धत आणि वापरलेले हत्यार पाहता, हे एखाद्या अट्टल गुन्हेगाराचे काम असून अमर कदमला केवळ आमिष दाखवून वापरले गेले असावे किंवा त्याला शिकारीच्या बहाण्याने घटनास्थळी बोलावून घेऊन तिथे दबा धरून बसलेल्या अन्य आरोपींनी ही हत्या केली असावी, अशी शक्यता विवेक ताम्हणकर यांनी वर्तवली आहे.
​दोन महिन्यांपूर्वीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष?
​सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सुशांत दळवी यांनी दोन महिन्यांपूर्वीच आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार कणकवली पोलिसात दिली होती. या तक्रारीत त्यांनी मुंबईतील राजकीय वजन असलेल्या व्यक्तींची नावे नमूद केली होती. या तक्रारीचा संदर्भ घेऊन तपास केल्यास या हत्येमागील खरा राजकीय दबाव आणि सूत्रधार समोर येतील, असे निवेदनात म्हटले आहे.
​पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
​इतकी मोठी आणि संवेदनशील घटना घडूनही जिल्हा पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. सिंधुदुर्गची शांतता भंग होऊ नये आणि जिल्ह्याची बदनामी टाळण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
​उपस्थित पदाधिकारी:
यावेळी शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हा सरचिटणीस रूपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अतिश उर्फ भाई जेठे, डी. डी. कदम, नितेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!