*कोकण Express*
*सिंधुदुर्गात नव्याने २९३ जण पॉझिटिव्ह*
*आज सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…*
*डॉ.श्रीपाद पाटील ; २ हजार ८८४ सक्रिय रुग्ण…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२४:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान आज कोरोनामुळे सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.तर जिल्ह्यात आज आणखी २९३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
मृतांमध्ये जामसंडे-देवगड येथील ६५ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कांबळेगल्ली-कणकवली येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कुंब्रल-दोडामार्ग येथील ५८ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाब,मधुमेहाचा त्रास होता. देवली-मालवण येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाब,मधुमेहाचा त्रास होत. नावळे-वैभववाडी येथील ५० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाब,मधुमेहाचा त्रास होता. मालवण येथील ६० वर्षीय महिला आहे. तिला मधुमेह,उच्चरक्तदाबाचा त्रास होता.