कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; डोक्यावर गंभीर इजा…

कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; डोक्यावर गंभीर इजा…

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; डोक्यावर गंभीर इजा…*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शहरातील बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह मोहन मळा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

प्राथमिक माहितीनुसार, डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम दिसून येत असल्याने हा घातपात आहे की अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे या घटनेभोवती गूढ निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. नेमकी घटना कशामुळे घडली याचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!