संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग मानसोपचार तज्ज्ञ मा . अजितकुमार साठे यांचे विद्यामंदिर प्रशालेत सामान्य मानसिक आरोग्य मार्गदर्शन

संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग मानसोपचार तज्ज्ञ मा . अजितकुमार साठे यांचे विद्यामंदिर प्रशालेत सामान्य मानसिक आरोग्य मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग मानसोपचार तज्ज्ञ मा . अजितकुमार साठे यांचे विद्यामंदिर प्रशालेत सामान्य मानसिक आरोग्य मार्गदर्शन*

*कणकवली : सौ. संजना हळदिवे*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रशालेतील पंधरा वर्षावरील विद्यार्थासाठी सामान्य मानसिक आरोग्य या विषयावर मा . अजितकुमार साठे साहेब मानसोपचार तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मा अच्युतराव वणवे सरांनी केले मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी संवेदना आणि मानसिक आरोग्य या विषयी माहिती सांगितली प्रमुख व्याख्याते अजितकुमार साठे यांनी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मानसशास्त्रीय कसोट्या वापरून आजच्या विद्यार्थ्यांचे दिशाहिन जीवन सुधारू शकते यांचे विविध उदाहरणांनी माहिती समजून सांगितले . मोबाईलचा अतिवापर तसेच मानसिक आजार मेंदूचे विकार बोथट होत गेलेली संवेदना यांचा विद्यार्थी जीवनावरील परिणाम सांगून आदर्श जीवन जगण्याचे मार्ग कथन केले . या कार्यक्रमाला इयत्ता नववीचे विद्यार्थी उपस्थित होते तसेच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते आभार विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे सरांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!