*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील इयत्ता १०वीच्या पालकांनी विद्यार्थ्यांना योग्यवेळी दाखविल्या करिअरच्या वाटा*
*कणकवली : संजना हळदिवे*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील सन २०२६ वर्षातील १०वीची बोर्ड परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांची करिअरची अभिरूची जाणून त्यांच्या पालकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन प्रशालेतील कला शिक्षक श्री प्रसाद राणे सर यांच्या मार्गदर्शनाने पालकांनी विद्यार्थ्यांची चित्रकलेती अभिरूची ओळखून देवरूख कला महाविद्यालय येथे पालक व विद्यार्थी यांनी महाविलयाला भेट देवून प्रवेशासंबंधी अचूक माहिती घेतली प्रत्यक्ष कला महाविलयाला भेट देऊन तेथील कलेची साधना आणि जीवनाचा यशाचा मार्ग कसा असतो या संबंधी डोळसवृतीने पहाणी करून भविष्यातील व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला प्रशालेने विद्यार्थ्यासाठी चित्रकलेतीक करिअरच्या सृजनशील वाटा हा उपक्रम देवरूख कला महाविद्यालयाचे प्राचार्य व तज्ज्ञ प्राध्यापक यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते त्यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचाच परिपाक म्हणून १०वीची परीक्षा दिल्यानंतर लवकरच आवड असलेल्या क्षेत्राची निवड करून कलेची साधना बालवयातच केल्यावर भविष्याचा वेध सुखकर होतो हे सुजाण व जागृत पालकांनी वेळीच ओळखून विद्यार्थ्यांच्या सृजनाचा वाटेचा शोध घेतला निकालाच्या अगोदरच व्यक्तीमत्वाचा शोध घेणाऱ्या जाणकार पालकांचे व मार्गदर्शक कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन .

