*कोंकण एक्सप्रेस*
*श्री मारूती वर्धापनदिन 24 रोजी*
*दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
हनुमान जयंतीचे औचित्य साधून युवा नेतृत्व विशाल परब आणि वेदिका परब पुरस्कृत तसेच नगरसेवक सचिन शेटये आणि जय हनुमान मित्रमंडळाच्या आयोजनाखाली दि.26 ते 30 मार्च या कालावधीत दररोज सायं. 7 वा. वेंगुर्ला शहरातील जुना स्टॅण्ड येथील मारूती मंदिर येथे दशावतार नाट्य महोत्सव संपन्न होणार आहे.
वेंगुर्ला-मारूती स्टॉप येथील हनुमान मंदिराचा वर्धापनदिन 24 मार्च रोजी संपन्न होणार आहे. सकाळी नित्यपूजा, लघुरूद्र, सायं.7.30 वा.आरती, तीर्थप्रसाद , रात्री 8 वा. देऊळवाडा भजन मंडळाचे भजन होणार आहे. तर 27 मार्च रोजी सायं 7 वाजता हरिपाठ आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासातर्फे केले आहे
या महोत्सवात दि.26 रोजी पार्सेकर पारंपारिक दशावतार मंडळाचा ट्रिकसिनयुक्त ‘शुक्रग्रहण’, दि.27 रोजी मोरे·श्वर पारंपारिक दशावतार मंडळाचा ‘सौभाग्य दान’, दि.28 रोजी श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळाचा ‘कृष्ण-हनुमान युद्ध’, दि.29 रोजी श्री सातेरी दशावतार नाट्य मंडळाचा ‘शिव भंडारे·श्वर’ तर दि. 30 रोजी बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोकनाट्य दशावतार मंडळाचा ‘अंबाजोगाई’ आदी दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

