वेंगुर्ल्यात विविध रंगांची उधळण

वेंगुर्ल्यात विविध रंगांची उधळण

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ल्यात विविध रंगांची उधळण*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव) *
शिमगोत्सव सांगतेच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहर, उभादांडा, परबवाडा या भागात लहान मुलांसह युवकांनी डिजेच्या तालावर नाचत विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली.
वेंगुर्ला शहर, परबवाडा आणि उभादांडा येथील शिमगोत्सवाला आगळीवेगळी परंपरा लाभली आहे. या शिगमोत्सवाची सांगता गुढीपाडव्याच्या पहाटे होते. त्यामुळे यावर्षी वेंगुल्र्याचा शिमगोत्सव हा 17 दिवसांचा होता. या कालावधीत हौशी कलाकारांनी पौराणिक तसेच काल्पनिक सोंगे घेऊन नागरिकांचे मनोरंजन केले. बुधवारी धुळवडीनिमित्त शहरासह परबवाडा व उभादांडा परिसरात ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली. सकाळपासूनच चौकाचौकात रंग खेळणारे युवक दिसत होते. दुपारनंतर यात भर पडत रंगपंचमीचा उत्साह वाढत गेला. सायंकाळपर्यंत हा रंगोत्सव ठिकठिकाणी सुरू होता.
रात्री 12 नंतर बागायतवाडी, नमसवाडी आणि वाघेश्वरवाडी येथील  रोंबटे पूर्वस मंदिर येथील मुख्य मांडावर येऊन धूळ मारणार आहेत. तसेच गाऱ्हाणे होऊन पहाटे उत्सवाची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!