एमकेसीएल राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्मिता कॉम्प्युटर च्या विद्यार्थ्याची बाजी

एमकेसीएल राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्मिता कॉम्प्युटर च्या विद्यार्थ्याची बाजी

*कोंकण एक्सप्रेस*

*एमकेसीएल राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्मिता कॉम्प्युटर च्या विद्यार्थ्याची बाजी*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील कट्टा येथील स्मिता कम्प्युटर एज्युकेशन या एमकेसीएलच्या सेंटरच्या वतीने MOM (Mkcl Olympiad Movement) या स्पर्धा परीक्षेत
कुमारी मनस्वी शैलेश परब*पेंडूर हायस्कूल इयत्ता ७ वी जिल्ह्यात दुसरी, देवांक देवेंद्र बांदेकर इयत्ता सहावी (वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सं कट्टा)जिल्ह्यात तिसरा तसेच देवांश संजय ठोंबरे वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा* इयत्ता नववी जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून उज्ज्वल असे यश संपादन केले…
या विद्यार्थ्यांना हॉटेल आराध्य कुडाळ या ठिकाणी पार पडलेल्या Mkcl च्या वार्षिक सोहळ्यात Mkcl चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री समीर पांडे सर, श्री अतुल सर , श्री. मंगेश जाधव सर, निकम सर, जिल्हा समन्वय श्री तेली सर वरिष्ठांच्या उपस्थितीत Mkcl कडून science Kit भेट देऊन


सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेकडून लर्निंग फॅसिलेटर कुमारी सविता शिरोडकर या ही उपस्थित होत्या. स्मिता कम्प्युटर मधून या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संचालिका सौ.श्रद्धा सुनील नाईक यांनी अभिनंदन केले .या यशाबद्दल परिसरातील सर्व शिक्षण प्रेमी हितचिंतक पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!