*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण आचरा पंढरपूर मार्गे अक्कलकोट बसचे आचरा येथे जल्लोशी स्वागत… प्रवाशांत उत्साह*
*आचरा : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग विभाग व मालवण आगारातर्फे मालवण ते आचरा श्रावण कोल्हापूर पंढरपूर मार्गे अक्कलकोट जाणारी राज्य मार्ग परिवहन मंडळाची एस. टी. ची टू बाय टू बस, बुधवार १८ मार्च पासून सुरू करण्यात आली. या बसचे आचरा येथे सरपंच जेरोन फर्नांडीस यांचे हस्ते श्रीफळ वाढवून जल्लोशी स्वागत करण्यात आले. याबद्दल सिंधुदुर्ग विभाग व मालवण आगाराचे व्यवस्थापक अनिरुध्द सूर्यवंशी यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
भक्तगण, व्यावसायीक व प्रवासी वर्गातून गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला यश आले. मालवण आचरा श्रावण कोल्हापूर पंढरपुर अक्कलकोट कडे जाणारी एकही बस नसल्यामुळे भक्तगणांचे व प्रवासी वर्गाचे फार मोठे हाल होत होते. याची मालवण शाखा व्यवस्थापक अनिरुध्द सूर्यवंशी यांनी लोकांच्या आग्रहामुळे, दखल घेऊन ही बस १८ मार्च पासून रोज संध्याकाळी ३-४५ वा. मालवण येथुन सुरु करण्यात आली आहे. या बस मुळे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ व पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई यांच्या भक्त गणांना तर कोल्हापूर येथील व्यापारी वर्गाला फार मोठा फायदा होणार आहे. या बसला प्रवाशी वर्गाचा कायमस्वरूपी चांगला भारमान मिळणार आहे. त्यामुळे ही बस चांगल्या प्रकारे नियमीत चालेल. अशी आशा आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी प्रवासी संघटना, व्यापारी वर्ग व भक्तगणांच्या वतीने व्यक्त केली.
आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी श्रीफळ वाढवून बसचे पुष्पहार घालुन स्वागत केले व प्रवाशांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आचरा उपसरपंच संतोष मिराशी, मालवणचे माजी उपसभापती व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक बागवे, आचरा ग्रा. पं. सदस्य पंकज वामन आचरेकर, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, दिलीप कावले, चंदन पांगे, प्रवीण आचरेकर तर रामगड येथे स्वागत करतांना रामगड सरपंच शुभम मटकर, उपसरपंच राजेंद्र जाधव,
सदस्य उल्का तारी, लक्षिता मेथर, बाळा मटकर, बाळू वेंगुर्लेकर, ज्ञानदेव वाघ, नरेश कामतेकर, बाळा मोहिते, अंकिता वाघ, आरती कामतेकर, वैभवी मालोंडकर, संजीवनी मेस्त्री, दिपा कामतेकर, श्रुती बांदिवडेकर, श्रेया बांदिवडेकर तसेच वाळू व्यावसायिक, रिक्षा व्यवसायिक आणि व्यापारी, रामगड व आचरा येथील अनेक प्रवासी – ग्रामस्थ उपस्थित होते.

