*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कुष्ठरोग निर्मूलन रॅली काढून समाज प्रबोधन*
*कणकवली : संजना हळदिवे*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या सहकार्याने कुष्ठरोग निर्मूलन रॅली काढून समाजातील जनतेला कुष्ठरोगाविषयी असणारी भिती नष्ट करणाऱ्या घोषणा व बॅनरवरील घोषवाक्ये या माध्यमातून समाज जागृतीचा संदेश देण्यात आला या वेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मा . अनिलपंत डेगवेकर साहेब यांच्या हस्ते रॅलीचे उद्गाटन करून रॅलीची सुरुवात केली . मुख्याध्यापक श्री पी. जे . कांबळे सर यांनी कुष्ठरोग आणि समाजातील गैरसमज व अंधश्रध्दा या विषयी मार्गदर्शन केले यावेळी रुग्णालयाचे अधिकारी श्री बुचडे आणि सहकारी यांनी कुष्ठरोग निर्मुलनाच्या जागृतीसाठी प्रशालेतील विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा / प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला प्रशालेच्या आरोग्य विभागाने नेटके नियोजन करून कार्यक्रम उद्बोधक केला श्री दरवडा सर सौ मुंडले मॅडम सौ वारघडे यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेऊन विद्यार्थांना आरोग्य आणि जीवन यांचा संदेश दिला .

