*कोकण Express*
*अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची कोविड सेंटरला भेट…*
*शिरवल, हरकुळ बुद्रुक व वैभववाडीत सांगुळवाडी सेंटरचा आढावा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली व वैभववाडी तालुक्यातील कोविड केअर सेंटरचा आढावा अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी आज घेतला.
यावेळी रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश दिले. याबरोबरच रुग्णांच्या केलेल्या व्यवस्थे ची माहिती देखील जोशी यांनी घेतली. रुग्णांना देण्यात येणारा आहार, तेथील स्वच्छता त्या अनुषंगिक बाबींची माहिती घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी जोशी यांनी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या केलेल्या व्यवस्थेची पाहणी देखील केली.
कणकवली तालुक्यातील शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमधील आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत तयार करण्यात आलेली कोविड केअर सेंटर व हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यात आली. तसेच वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी कोविड केअर सेंटरला देखील जोशी यांनी भेट देत आढावा घेतला. यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, आरोग्य कर्मचारी प्रशांत बुचडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.