*कोंकण एक्सप्रेस*
*गुढीपाडव्यानिमित्त नवीन कुर्ली येथे महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग*
*नवदुर्गा युवा मंडळ आणि नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून आयोजन*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
नवीन कुर्ली फोंडाघाट येथे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या स्वागतार्ह गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी रात्री ठीक ९:०० वाजता भवानी मैदान येथे चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा देवेंद्र नाईक प्रस्तुत “मधु कैठप” हा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
तरी नवीन कुर्ली गावातील तसेच नजीकच्या परिसरातील सर्व नाट्य रसिकांनी या महान पौराणिक नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवदुर्गा युवा मंडळ आणि नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून करण्यात आले आहे.

