दाभोली गावात दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार

दाभोली गावात दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार

*कोंकण एक्सप्रेस*

*दाभोली गावात दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार*

*वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

दाभोली ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या विशेष महिला ग्रामसभेत दाभोली गावात एकजुटीने आणि एकमताने “दारूबंदीसाठी’ ठराव करण्यात आला. दरम्यान, यासंबंधीचे लेखी निवेदन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.
दाभोली गावामध्ये गेली कित्येक वर्षे अवैध दारूविक्री चालू आहे. या दारूमुळे बरीच कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. तसेच युवा पिढीचेही भविष्य धोक्यात आहेत. गावातील दारूबंदी होण्यासाठी महिलांनी एकत्र येत दारूबंदीचा ठराव केला. त्यानंतर वेंगुर्ला पोलिस स्टेशनला भेट देत तशाप्रकारचे निवेदनही सादर केले. दाभोली गावातील दारूबंदीबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास वरिष्ठपातळीवर दाद मागण्यात येईल. तसेच प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन सादरकरतेवेळी सरपंच उदय गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ यांच्यासह ग्रामसंघ महिला तसेच गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या. वेंगुर्ला पोलिस उपनिरीक्षक तुकाराम जाधव यांनी हे निवेदन स्विकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!