जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं.१ विद्यार्थ्यांचे ‘युवा संदेश प्रतिष्ठान’ परीक्षेत यश

जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं.१ विद्यार्थ्यांचे ‘युवा संदेश प्रतिष्ठान’ परीक्षेत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं.१ विद्यार्थ्यांचे ‘युवा संदेश प्रतिष्ठान’ परीक्षेत यश*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं.१ येथील इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. इयत्ता ४थी मधून कु. समर्थ समाधान वाघमोडे याने १६४ गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले. तर कु. पृथ्वीराज मारुती लाड (१४८ गुण) याला सिल्व्हर मेडल मिळाले. याशिवाय कु. वीरा आनंद तावडे, रिया जानू खरात, अस्मि नरेश मांजरेकर, निधी श्रीधर रावराणे, प्रांजल नारायण सावंत आणि जुई हेमंत म्हापसेकर यांनीही चांगले गुण मिळवले. इयत्ता ३री मधून कु. तन्मय लकुळ गोसावी (१७८) आणि कु. रुद्र दत्तात्रय रेवडेकर (१६०) यांनी गोल्ड मेडल मिळवले. कु. विराज विजय आग्रे (१३८) याने सिल्व्हर मेडल मिळवले. तसेच अर्णव विजय राणे, किंजल कांतीलाल गांगुर्डे, सोहम सोमा म्हाड्गुत, पार्थ सचिन सापळे, प्रचिती सुनिल शिंदे, आयुष राजेंद्र मर्ये, देविका महेश राठोड आणि सोनाबाई परशुराम भिसे यांनीही गुण मिळवले. इयत्ता २ रीमधून कु. तनिष प्रशांत सापळे (१५०) व कु. चिराग स्वप्नील गवळी (१४८) यालाही सिल्व्हर मेडल मिळाले. कु. वेद्यम सुनिल शिंदे (११२) याने ब्रॉन्झ मेडल पटकावले. मृण्मयी बिडये, धनश्री सागावकर, मयंक खरात, गोपाळ सावंत, स्वरा गायकवाड, हर्षाली तेली आणि गायत्री नानचे यांनी परीक्षेत सहभाग नोंदवत चांगले गुण मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!