*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अंतर्गत मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न*
*कणकवली ः संजना हळदिवे*
जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग ‘बेटी बचाव बेटी पढाओ’या उपक्रमा अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मुलींसाठी आरोग्य तपासणी व मुलींच्या आरोग्य संबंधी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे कांबळे सर ,पर्यवेक्षक ए. व्ही. वनवे ,डॉक्टर इंद्रकुमार वाघमारे, डॉक्टर सुचिता कदम, श्रीमती रिया सांगेलकर, श्रीमती रोजा खडपकर, सौ. नेहा सावंत, सौ.शर्मिला केळुसकर ,सौ विद्या शिरसाट, स्वप्नाली नाईक ,श्रीमती अक्षता बुचडे, अमित राऊळ, स्वानंदी शिरसाट, बुचडे व प्रशालेचे इतर शिक्षक हे सर्व शासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक
डॉ. पी. जे.कांबळे यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. डॉक्टर कदम यांनी मासिक पाळी संदर्भातील मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर वाघमारे यांनी मुलींसाठी पोषक आहार यासंबंधी मार्गदर्शन केले. रिया सांगेलकर यांनी आपली सुरक्षितता व रोजा खडपकर यांनी महिलांच्या समस्या, ताण-तणाव यासंदर्भातील सल्ला व मार्गदर्शन केले. जिल्हा महिला सिंधुदुर्ग अधिकारी शिनगारे यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले. केळुस्कर यांनी देखील मासिक पाळी वाईट नाही ती नैसर्गिक चांगली व आवश्यक प्रक्रिया आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्नाली नाईक व गोवेकर यांनी केले. प्रशालेच्या वतीने आरोग्य विभागाचे आभार प्रदर्शन विद्या शिरसाट यांनी केले व मुलींना स्वादिष्ट अशा नाश्त्याची व्यवस्था करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

