*कोंकण एक्सप्रेस*
*छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर उद्या साटेली-भेडशी येथे*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तहसील कार्यालयातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ उद्या दि. १४ मार्च रोजी साटेली-भेडशी मंडळातील ओम गणेश मंडळ हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात फेरफार प्रकरणांचा निपटारा, डिजिटल ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रांचे वितरण, तसेच अकृषिक (NA) परवानगीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, पीएम किसान व ॲग्रीस्टॅग नोंदणी, सामाजिक योजनांचे लाभ आदी कामे शिबिरस्थळी केली जाणार आहेत.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

