विद्यार्थ्यांनी हाताळली शिवकालीन हत्यारे

विद्यार्थ्यांनी हाताळली शिवकालीन हत्यारे

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यार्थ्यांनी हाताळली शिवकालीन हत्यारे*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुर्ला कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये 12 मार्च रोजी इतिहासाची साधने व प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास, नाणी यांची माहिती जाणून घेत शिवकालीन हत्यारेही हाताळली.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन तसेच मानावता विकास संस्था भारत यांच्या सहकार्याने गुरूवारी श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये इतिहासाची साधने यावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर राणे आणि आबा चिपकर यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा इतिहास, शिवकालीन नाणी आणि हत्यारे याबाबत माहिती दिली. या उपक्रमाबद्दल शाळेच्यावतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.
फोटोओळी – इतिहासाची साधने व प्रदर्शनांतर्गत विद्याथ्र्यांनी शिवकालीन हत्यारे हाताळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!