*कोंकण एक्सप्रेस*
*’द केरला स्टोरी २’ च्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये जनजागृती; पालकमंत्री नितेश राणे यांची अनोखी संकल्पना!*
**कणकवली ः संजना हळदिवे*
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आदरणीय श्री .नितेश राणे यांच्या संकल्पनेतून इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यीनींना आज गुरुवार दिनांक 12 मार्च 2026रोजी केरला स्टोरी 2 हा पिक्चर 9:30 ते 11:40 पर्यंत मोफत दाखवण्यात आला. यावेळी कणकवलीच्या नगरसेविका सौ .मेघा गांगण मॅडम उपस्थित होत्या .त्यांनी मुलीना या चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही समाज किंवा धर्माबद्दल गैरसमज निर्माण करणे हा नसून या चित्रपटाच्या माध्यमातून आजकाल सोशल मीडियावरील वापर करताना मुलींची फसवणूक किंवा चुकीच्या संबंधातून सावध राहणे ,स्वतःचे निर्णय विचारपूर्वक आई-वडिलांच्या संमतीने घेणे किंवा कोणावर लगेच विश्वास ठेवू नये या दृष्टीने मुलींमध्ये जागरूकता आणि सुरक्षितेबद्दल माहिती देणे हा पिक्चर दाखवण्यामागचा आमचा हेतू आहे . त्यावेळी त्यांनी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री.पी.जे कांबळे सर यांचे धन्यवाद व्यक्त केले आणि आमच्या प्रशालेच्या सौ.प्रिया सावंत मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सौ.मेघा गांगण मॅडम तसेच मुलींच्याउज्वल भविष्याचा विचार करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे सर यांचे देखील प्रशालेच्या वतीने आभार मानले .या चित्रपटातील काही प्रसंग मनाला भिडणारे व विचार करायला लावणारे होते मुली, शिक्षिका, माता पालक भावनिक झाल्या होत्या .मुलींना देखील समाजातील वास्तव ,सावधगिरी आणि योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व अधिक स्पष्टपणे या चित्रपटाच्या माध्यमातून जाणवले.

