*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली येथील शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान !*
*सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या स्मरणार्थ आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
सामाजिक कार्यकर्ते उत्तम धुमाळे यांच्या स्मरणार्थ सोमवार ९ मार्च रोजी कणकवली येथील श्री चौंडेश्वरी हॉल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होत ३५ दात्यानी रक्तदान करून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला.
उत्तम धुमाळे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असत. त्यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त त्यांचे चिरंजीव तथा शिंदेसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांनी रक्तदान तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबिरासाठी त्यांना नवजीवन रक्त केंद्र, कणकवली यांचे सहकार्य लाभले. तर मोफत मोतीबिंदू निदान तपासणी नेत्रचिकित्सक डॉ. अशोक कदम यांनी केली.
या शिबिराचा प्रारंभ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिंदेसेना उपनेते संजय आग्रे,उपनगराध्यक्ष सुशांत नाईक,नगरसेवक
जयेश धुमाळे, नगरसेवक रुपेश नार्वेकर,
नगरसेवक बाळू पारकर, मेहुल धुमाळे,निकीत मुरकर ,शिंदेसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश सावंत -पटेल,तालुकाप्रमुख दामू सावंत,मनीष सावंत, उत्कर्षा धुमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. रुजाय फर्नांडिस, डॉ. अशोक कदम, भरत उबाळे, महेंद्र सांबरेकर,मारुती उर्फ बंडू धुमाळे, राजेंद्र धुमाळे, किशोर धुमाळे, सुधीर धुमाळे, विपुल धुमाळे, अमित धुमाळे, विशाल नेरकर, सौरभ पारकर,ऋषिकेश कोरडे, ऋतुजा कोरडे, मेघावी जयेश धुमाळे, दत्ता वावळीये यांनीही शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थित मान्यवरांनी रक्तदान शिबिराच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्याचा वारसा कौतुकास्पद !
उत्तम धुमाळे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवून मेहुल धुमाळे आणि त्यांचे सहकारी व कुटुंबीय जपत आहेत.हे कौतुकास्पद आहे. समाजाप्रती असलेले आपले ऋण फेडण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.असे गौरवोद्गार संदेश पारकर यांनी यावेळी काढले.
शिबिराचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय आग्रे , मेहुल धुमाळे आदी उपस्थित होते.

